गावचा इतिहास

खंबाळे भा गावाची स्थापना हि हेळवी रेकॉर्डवरून शालिवाहन शके ११२२ इस १२०० साली झाली. मूळ पुरुष पुणदी ता.तासगावहून आला एक भाऊ शिरगाव (विसापूर) येथे राहिला व एक खंबाळे मध्ये आला मूळ गाव खामजाई मळ्यात वसले त्यानंतर जमिनी कसदार या कारणाने आज गावठाण वसाहतीत आले. देवळा पुढील होळीचे टेक ते रामदादा घराजवळील पांढरी या भागात वसाहत झाली पुढे मूळ पुरुषाच्या तीन मुलांवरून धनाजी, मानाजी व रेकोजी या तीन भावंडाचे पुढे तीन वाडे झाले.

रामोशी समाज खंबाळे गावामध्ये शालिवाहन शके १५०७ इसवी सन १६८५ साली कळंबीहून खंबाळे गावामध्ये आला. त्या अगोदर मस्के समाज पन्नास एक वर्षापूर्वी अगोदर आला आहे. मोहिते समाज वडवे गावाहून आला. कदम परिवार हा ढवळी ता. तासगाव येथून आला. भोसले कार्वेकर नेलकरंजी ता. आटपाडीहून कार्वे व नंतर खंबाळे येथे आला. निकम परिवार चिंचणीहून आला. जाधव परिवार हिंगणगाव वरून आला सुतार व जाधव (मागास) आळसंदहून खंबाळे गावामध्ये आले. जावीर गोरवे मानदेशातून आटपाडी सांगोला तालुक्यातून आले.

स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज सेनेत संदीपान नाना व बाळू दुधावाल्याचे वडील सखाराम सुर्वे डाकवाले म्हणून बातम्या पोहचवण्याचे काम करत होते. दत्तोबा कृष्णा सुर्वे इंग्रज सैन्यात नोकरीस होते. महायुध्याच्या दरम्यान जपान हल्यात युद्ध कैदी झाले नंतर आव्हानानुसार कैदी सैनिक सुभाषचंद्र बोस यांचे स्वातंत्र्य लढ्यात आझाद हिंद सैनिक म्हणून सामील झाले व ब्रम्हदेश मोहीम सिंगापूर लढा मोहिमेत सहभागी स्वातंत्र्य सेनानी होते. सुभाषचंद्र बोस यांचा पाडाव झाला व जर्मनीची मदत मिळवण्यासाठी सुभाष बाबू विमानाने जर्मनीला जाते वेळी सैनिकांना संबोधून जे भाषण केले व विमान उड्डाणामध्ये गेले त्या भाषणाचे साक्षीदार दत्तोबा आबा गावाला कुस्ती परंपरा हि होती पूर्वीच्या जमान्यात जिल्हा स्तरापर्यंत मल्ल गाजलेले आहेत. गावामध्ये वीज आली उद्घाटन सोहळा १६/०३/१९८० रोजी झाला. पूर्वी औंध संस्थानात गाव होते त्या काळी मोठे सजाचे अधिकारी लेवलचे गाव भाळवणी होते म्हणून मोठे (सज्जा) गाव भाळवणी खंबाळे गावाच्या पुढे जोडले जाते.

१ एप्रिल १९६४ रोजी अखिल भारतात आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी दुपारी २ वाजण्याचे आत गावाचा वसूल ट्रेझरीत भरला होता तेव्हा अखिल भारतात गावाचा पहिला क्रमांक आला. तालुक्यातील ग्रामीण भागातील २ नंबरची नळयोजना खंबाळे गावची आहे सन – १९६६/१९६७ सालापासून