ग्रामदेवता विषयी माहिती

गावामध्ये दर्गोबा देवाजी यात्रा चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असते त्या नंतर ५ दिवसांनी मूळ नक्षत्र असते त्या दिवशी दर्गोबा देवाजी यात्रा गावात असते त्या दिवशी दुपारी 4 वाजता मानाची बैलगाडी कै.शिवाजी मारुती सुर्वे यांचे घरातून निघते त्या गाडीमध्ये मानाची आंमबलीची घागर शामराव दत्तू सुर्वे (संदीपान नाना) यांचे घरातून निघते संपूर्ण गावातून मिरवणूक देवाला जाते नारळ नैवद्य करतात गावातील सर्व लोक देवाल येतात व त्यानंतर पहाटे 4 वाजता पालखी वाजत गाजत गावातून निघते देवळात पोहचते त्यावेळी देव श्री. विलास आनंदा सुर्वे यांचे अंगामध्ये येऊन देवाची भाकणूक सांगितली जाते त्यानंतर देवळात दर्गोबा देवाचे लग्न लावले जाते.
खंबाळे गावामध्ये मार्गशीष महिन्यामध्ये पौर्णिमेला दत्त जयंती असते त्या दिवशी यल्लमा देवाजी यात्रा भरते गावातील सर्व मुली ज्या लग्न होऊन सासरी असतात त्या यात्रेला माहेरी येतात देवाला नारळ नैवद्य व नवसाचे माहेर देवीला करतात व रात्री ९ वाजता देवीचे पुजारी महादेव परशुराम सुर्वे यांचे घरातून पालखी निघते व देवीची पालखी संपूर्ण गावातून मिरवणूक पार पडते. त्यानंतर रात्री १२ वाजता भर पौर्णिमेला देव खिचामध्ये पडतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खिच दही दुधाने विजवतात आणि यात्रा पूर्ण होते.
खंबाळे गावाच्या स्थापनेपासून खमजाई देवी आहे खमजाई देवीच्या नावावरून गावाचे नाव खंबाळे ठेवण्यात आले खमजाई मंदिर हे गावाच्या इतिहासाचे प्रतिक आहे. खमजाई देवाचा भंडारा आश्विन महिन्यातील दुसऱ्या एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बारस असते त्या दिवशी देवीचा भंडारा असतो त्या दिवशी गावातील सर्व लोक प्रसाद घेण्यासाठी येतात.



शाळेची माहिती

गावात शाळेची स्थापना जिल्हा लोक बोर्ड दक्षिण सातारा यांचे वतन १७/१२/१९५६ साली शाळा सुरु झाली शाळेची जुनी इमारत म्हणजेच शाळेची पहिली इमारत जागा खरेदी १९३९ साली व शाळा बांधून पूर्ण १९४० साली झाली. त्यापूर्वी चावडीमध्ये काही दिवस नंतर देवळात त्यानंतर पाटील वाड्यात शाळा भरून होती.
या शाळेच्या रेकॉर्ड वरील पहिले विद्यार्थी सीताराम विठोबा कदम, दत्तोबा कृष्णा सुर्वे, गणपती पांडुरंग सुर्वे इ. ७ विद्यार्थी पहिली शाळा सुरु झाली. गावातील पहिले अकरावी J.M. पाटील पहिले पदवीधर,(Msc.सायन्स) शंकरराव पवार, पहिले इंजिनीअर हणमंतराव पवार, पहिले अग्रीकल्चर पदवीधर सज्जन पवार, पहिले मेडिकल पदवीधर सुभाष पवार, पहिली महिला पदवीधर भारती डोंबे. सद्य स्थितीत गावामध्ये जिल्ह्य परिषद शाळा खंबाळे भा म्हणून प्रचलित आहे.

तसेच मिळालेली पुरस्कार पुढीलप्रमाणे -

  • सांगली जिल्हा आदर्श शाळा व स्वच्छ सुंदर शाळा प्रथम पुरस्कार प्राप्त
  • महाराष्ट्र शासनाचा संत गाडगेबाबा स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त
  • सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकासामध्ये तालुक्यात व जिल्ह्यात प्रथम
  • सांगली जिल्ह्यातील एक नामांकित शाळा
  • नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व NMMS परिक्षेमध्ये अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत
  • मॉडेल स्कुल साठी निवड असणारी.... ही खंबाळे शाळा....

जिल्ह्य परिषद शाळा खंबाळे भा चे सर्व शिक्षक खालीलप्रमाणे

  1. १) श्री. शिवाजी भिमराव जाधव-वरिष्ठ मुख्याध्यापक
  2. २) श्री. उत्तम नारायण कदम- विषय शिक्षक
  3. ३) श्रीमती सुजाता जोतीराम पाटील- उपशिक्षिका
  4. ४) श्री. धनंजय हणमंत चोथे- उपशिक्षक
  5. ५) श्रीमती सुवर्णा सुरेश टकले- उपशिक्षिका
  6. ६) श्री. संतोष रघुनाथ जगताप- उपशिक्षक